Latest News

6/recent/ticker-posts

मदनसुरी परिसरात रक्षाबंधन चा उत्सव उत्साहात साजरा

मदनसुरी परिसरात रक्षाबंधन चा उत्सव उत्साहात साजरा



मदनसुरी:(प्रतिनिधी/ द्रोणाचार्य कोळी) भारतीय संस्कृतीत रक्षा बंधन च्या दिवशी बहीण भावाला राखी बांधते, आणि भाऊ बहिणीच्या सदैव रक्षण करेल असे तिला दृढ वचन देतो. ज्यावेळी देवासुर संग्राम झाला, त्यावेळेस राक्षस देवावर्ती भारी पडू लागले. त्यावेळी इंद्राची पत्नी इंद्रायणी एक धागा अभिमंत्रित करून इंद्राच्या हातात बांधून दिले, आणि त्याच अभिमंत्रीत धाग्यामुळे देवांचा राजा इंद्र देवाचा विजय झाला. असे वेदांमध्ये सांगितले आहे. शिवाय द्रौपदीचे वस्त्रहरण झाले त्यावेळेस सुद्धा भगवान श्रीकृष्णाने तिचे रक्षण केले होते. त्यावेळेसच द्रोपदीने साडीचा एक तुकडा भगवान श्रीकृष्णाच्या हातात बांधली होती, तेंव्हापासूनच या रक्षा बंधनाची प्रथा सुरू झालेली आहे. स्त्री ही जगतजननी असल्यामुळे ती सर्वावरर्ती निर्व्याज प्रेम करते. भाऊ बहिणीचे आदर्श नाते दर्शविणारा हा पवित्र दिवस रक्षा बंधन आपण साजरा करत असतो. मदनसुरी, कोकळगाव आदी ग्रामीण भागातील बहिणीने नववस्त्र धारण करून पाटाभोवती सुबक रांगोळी काढून पाटावर भाऊरायास बसवून भावाच्या हातात राखी बांधून भावाच्या रक्षणासाठी व दीर्घायुष्य साठी देवाला श्लोक रुपात प्रार्थना केली. ओम एनबंधु बळीराजाहा, दानवेनद्रो महाबलाहा, तेंनत्व प्रतिब्धन्हा रक्षेमाचलमहाचल. भाऊ बहिणी मधील आत्मीयता, जिव्हाळा, प्रेम, वात्सल्य अजूनही टिकून असल्याचे रक्षा बंधन च्या माध्यमातून दिसून आले. भाऊ बहिणी च्या अतूट प्रेमाचे नाते अधिक दृढ करण्याचा रक्षा बंधन सण उत्साहात साजरा करण्यात आला.


Post a Comment

0 Comments