आनंदमुनी उच्च माध्यमिक विद्यालयाचा शंभर टक्के निकाल
केळगाव (प्रतिनिधी/वसीम मुजावर ) तालुक्यातील केळगाव येथील आनंदमुनी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीचा बारावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन करून यशाची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयातून 146 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने विद्यालयाचा 100% निकाल लागला आहे. निलंगा तालुक्यातील केळगाव येथील आनंदमुनी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बारावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन केले
असून यात विज्ञान शाखेतून 79 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यात कांबळे नम्रता मारुती 90 . 83 टक्के गुण घेऊन विद्यालयात प्रथम तर चव्हाण वैष्णवी विठ्ठल 89. 16 टक्के गुण घेऊन द्वितीय व देशमुख अथर्व सतीश 86 . 66 % गुण प्राप्त करून तृतीय आला आहे. विज्ञान शाखेतून 51 विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तर वाणिज्य शाखेतून 25 विद्यार्थी बारावी बोर्ड परीक्षेत बसले होते. यात कदम वैष्णवी व्यंकट 83 . 83 टक्के गुण घेऊन प्रथम तर फकीर सालिया मुस्ताक अहमद 81 . 33 टक्के गुण घेऊन द्वितीय व सूर्यवंशी शुभांगी बालाजी आणि मुगळे विशाल रंजीत हे दोघे 81. 33 टक्के गुण घेऊन तृतीय आले आहेत. वाणिज्य शाखेतून विशेष प्राविण्य श्रेणीत 20 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेतून 42 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यात निडबोने निखिल गोपीनाथ 77 . 83% गुण घेऊन विद्यालयात प्रथम तर काळे निकिता गोविंदराव 76 . 33 टक्के गुण घेऊन द्वितीय व बुकके रामेश्वर सोमनाथ 74 . 83 टक्के गुण घेऊन तृतीय आला आहे. कला शाखेतून तीन विद्यार्थी विशेष प्रावीण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयातून 146 विद्यार्थी बारावी बोर्ड परीक्षेस बसले होते. 146 पैकी 146 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने विद्यालयाचा 100% निकाल लागला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष मल्लिकार्जुन मिटकरी, सचिव, संचालक मंडळ, प्राचार्य एस एम मिटकरी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
0 Comments