शिवजागृती कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता १२ वी परीक्षेचा सर्वोत्तम निकाल
नळेगाव:( प्रतिनिधी/बाळासाहेब बरचे ) दि.येथील शिवजागृती कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता बारावी एप्रिल - मे २०२१ च्या बोर्ड परीक्षेच्या मुल्यमापनावर आधारित निकालात महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे. या परीक्षेला महाविद्यालयातून एकूण २१४ विद्यार्थी परीक्षेला प्रवेशित होते . महाविद्यालयाचा सरासरी निकाल १००% लागला असून पैकी ६२ मुले विशेष प्राविण्यासह व १५१ मुले प्रथम श्रेणीसह उतीर्ण झाले आहेत . महाविद्यालयातून कला शाखेतून अनुक्रमे प्रथम- कु.सावंत सरोजा राजेंद्र ८९.५० % , द्वितीय- कु.निटुरे वैष्णवी धोंडीराम ८३.१६ % , तृतीय- कु. गायकवाड वैशाली शंकर ८०.१६ % वाणिज्य शाखेतून अनुक्रमे प्रथम- कु.जाधव समीक्षा दिपक ९०.००% , द्वितीय- कु.भोसले ऐश्वर्या शिवाजी ८७.५०% , तृतीय- कु. पवार पुनम अशोक ८५.६६% , विज्ञान शाखेतून अनुक्रमे प्रथम- कु.धानुरे नगमा मुक्रम ८७.३३% , द्वितीय- माळी उमेश सिध्देश्वर ८३.८३% , तृतीय - कु. गंदगे वैजयंती माधव ८०.५० % या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आभिनंदन व कौतुक महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष माधवराव पाटील(नळेगाव), उपाध्यक्ष बब्रुवान जाधव, सचिव विश्वनाथ सताळकर, डॉ.उमाकांत शेटे, बालाजी पेन्सलवार, रामजी मलशेट्टे, उमाकांत मळभागे, महाविद्यालयाचे प्राचार्य संजय वाघमारे व सर्व प्राध्यापक, परिसरातील पालक, नागरिक आणि महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

0 Comments