गावच्या लोकसहभागातुन जि.प.प्रा शाळा चिंचोली(भं) शाळेचा कायापलट

निलंगा: तालुक्यातील भंगार चिंचोली येथील एक वाँटस्अप ग्रुपच्या माद्यमातुन गावातील काही शिक्षणप्रेमी ने गावातील जि.प शाळे करीता आपण एकञ येऊन लोकसहभागातुन काय करता येत असेल तर करु या ज्याना जमेल तितके साह्य करा या अहवानाला प्रतिसाद देत अवघ्या पाच दिवसातच एक लाख एक्कावन्न हजार रुपये जमा झाले व लोकसहभागातुन शाळेचा कायापालट झालेले दिसुन येते. तालुक्यातील एकुण ६० शाळेचे BALA अतंर्गत निवड झालेले आहे त्यात भंगार चिंचोली येथील जि.प. शाळेचा पण नाव असल्याचे समजताच शाळेतील सर्व शिक्षक वृंद व गावातील एका शिक्षण प्रेमी तरुण हे गावातील वाॕटस्अप ग्रुप वरती अहवान करीत सहकार्य करण्याचे अहवान केले त्याला प्रतिसाद देत अवघ्या पाच दिवसात एक लाख एक्कावन्न हाजार रुपये जमा झाले व वस्तु स्वरुपात जवळपास साठ हाजार रुपये असे जमा झाले त्यात शाळेचे शिक्षक वृंद यांचा मोठा वाटा असुन त्याच बरोबर माजी विद्यार्थी, परगावी राहात असलेले मुळचे गावचे सह छोटे व्यापारी शेतकरी सह दररोज शेतात मजुरी करणारे देखील या कार्यासाठी हातभार लावला तर यात अनेक जन निनावी पद्धतीने पण मदत केल्याचे साःगण्यात आले. यामुळे शाळेचे कायापालट झाल्याचे दिसुन येते संरक्षण भिंत, वृक्षा लागवड, रंगरःगोटी, बोलक्या भिंती सह अनेक भौतीक सुविधा झालेले दिसुन येते. आशा करोनाच्या काळात देखील सर्व व्यापार मंदावलेले असताना व महागाईच्या अलेख वाढत असताना देखील गावातील सर्व गावकरी शाळे साठी व शिक्षणासाठी एकञ येऊन भरभरुन योगदान दिले व शाळेचा कायापालट केले हे कौतुकास्पद बाब आहे. या करीता शाळेतील शिक्षक वृंद, शालेय शिक्षण समिती गावातील व मुळ गावचे पण उद्योग साठी परगावी गेलेले तरुण व सर्व गावकरी यांनी कष्ट घेतले.
0 Comments