कै.डॉ.शिवाजीराव निलंगेकरच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त कोरोना योध्दा सन्मान सोहळा उत्साहात
के वाय पटवेकर
निटूर: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै.विकासरत्न डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त कोरोना योध्दा सन्मान- 2021 हा सन्मान सोहळा आज दि. 21 ऑगस्ट रोजी दुपारी 1:00 वाजता लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय मुगाव पाटी तालुका निलंगा येथे निटूर जिल्हा परिषद गटातील प्राथमिक आरोग्य केंद्र निटूर व प्राथमिक आरोग्य केंद्र पानचिंचोली अंतर्गत आशा, आरोग्य सेविका, आरोग्य कर्मचारी व पत्रकार यांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. यावेळी निलंगा तालुका संगायो समितीचे सदस्य सुरेंद्र धुमाळ, निलंगा तालुका आरोग्य आधिकारी श्रीनिवास कदम, प्रा. दयानंद चोपणे, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मधुकर आबा पाटील, निटूर जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ. कोमलताई धुमाळ, निलंगा तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक पंडीतराव भदरगे, प्रदीप काळे उपविभागीय जलसंधारण अधिकारी मृदा व जलसंधारण विभाग निलंगा, संचालक दिनकर नाना निटुरे, संचालक नरसिंग ढाकणे, औराद बाजार समिती चे संचालक गंगाधर चव्हाण, निटूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीनिवास मोरे, पानचिंचोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गणपतराव मोरे, डॉ. अश्विनी शिंदे, डॉ. प्रतिभा येळकर, डॉ. स्नेहल पाटील, डॉ. प्रतिभा मंत्री, निटूर पोलीस चौकीचे पोलीस जमादार सत्यवान कांबळे, मुख्याध्यापक अनिल पाटील, नणंद चे सरपंच हारीभाऊ बोळे, उपसरपंच दिगंबर सुर्यवंशी आदीच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
0 Comments