Latest News

6/recent/ticker-posts

लोकमंगल बँकेच्या वतीने कासार सिरसी परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

लोकमंगल बँकेच्या वतीने कासार सिरसी परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव


कासार सिरसी:{प्रतिनिधी/फिरोज जहागीरदार} लोकमंगल बँकेच्या वतीने कासार सिरसी परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँक शाखा कासार शिरशीच्या वतीने येथील श्री करी बसवेश्वर विद्यालया सह हरिजवळगा येथील ज्ञानेश्वर विद्यालय व उस्तुरी येथील इयत्ता दहावी व बारावी वर्गात विशेष गुण प्राप्त करून उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला बँकेच्या या स्तुत्य उपक्रमाबाबत शिक्षक व पालक वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे कासार शिरशी लोकमंगल बँकेच्या वतीने परिसरातील इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला यात हरिजवळगा येथील ज्ञानेश्वर विद्यालय व उस्तुरी येथील विशेष गुण मिळवणारे विद्यार्थी नागेश कंगाळे, आकांक्षा शैलेश मनियार, आकांक्षा युवराज सांगवे या विद्यार्थ्यांचा येथील मुख्याध्यापक संजय पांडुरंग लादे यांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला. येथील श्री करी बसवेश्वर विद्यालयात प्राचार्य सौ सविता मुरूमकर यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यात रिजनल बँकेचे मॅनेजर बालाजी पाटील यांच्या हस्ते इयत्ता दहावी व बारावीती उत्तीर्ण  कौसल्या डोंबाळे, तनुजा नड्डे, निकिता मंडले या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या समारंभास बँकेचे सल्लागार सर्व श्री गहिनीनाथ पाटील, सिद्धेश्वर कावळे, फिरोज जागीरदार, संदीप चिंचनसुरे, अनिता सूर्यवंशीमहादेव पाटील  यांचेसह सहशिक्षक पी एम पासमे, पर्यवेक्षक बिराजदार राजेंद्र, गोरे किशोर बेळकीरे सुनील, घोसले हजर होते. आर्थिक व्यवहाराची बांधिलकी न जपता ही बँक लोकाभिमुख कार्यक्रमाचे आयोजन करते गुणवंत विद्यार्थ्यां चा सत्कार करते त्यांच्या या स्तुत्य  उपक्रमामुळे या बँकेने लोकांच्या मनात कायम स्थान मिळवले असल्याचे सांगून बँकेच्या या स्तुत्य उपक्रमा बाबत प्राचार्य मुरुमकर यांनी समाधान व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments