मुदती संपणाऱ्या नगरपरिषदा/नगरपंचायती निवडणुकीचे बिगुल वाजले
लातूर: दि.२१ राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले नवे धोरण एक प्रभाग एक सदस्य डिसेंम्बर 2021 ते फेब्रुवारी 2022 या कालावधीत नगरपालिका, नगर परिषदेचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने या मुदत संपणाऱ्या नगर पालिकाच्या निवडणुका वेळेत होण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाकडून 23 ऑगस्ट 2021 पासून प्रभाग रचनेच्या कामाला सुरुवात करण्याच्या सूचना उपआयुक्त राज्य निवडणूक आयोग अविनाश सणस यांनी एक परिपत्रक काढून दिल्या आहेत. या परिपत्रका नुसार 2011 मधील लोकसंख्या लक्षात घेऊन नगर पालिका चे सदस्य संख्या निश्चित आणि त्या नुसार प्रभाग रचना करावी, तसेच ही प्रभागरचना बहू सदस्य नसून प्रत्येक प्रवाह प्रभागामध्ये एक नगरसेवक यानुसार नवीन रचना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यानुसार ज्या नगरपालिकांच्या कालावधी संपला आहे भाषा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रत्येकजण कंबर कसून उभा राहणार आहे.त्याचाच एक भाग म्हणून जागोजागी बुथ बैठका चे आयोजन सुरू झाले आहे. नाराज कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी या बैठकांमधून वेगवेगळ्या पदांची नियुक्ती करण्यात येत आहे. एकंदरीत सर्वच पक्ष जोमाने कामाला लागल्याचे चित्र दिसत आहे.

0 Comments