धनगर समाज विकास परिषद लातूर शहर अध्यक्ष पदी आभिजीत मदने यांची निवड
लातूर: धनगर समाज विकास परिषद लातूर शहर अध्यक्ष पदी आभिजीत मदने यांची निवड करण्यात आली असून ही निवड लातूर येथील गिरवलकर मंगल कार्यालय येथे संपन्न झालेल्या एका कार्यक्रमात धनगर समाज विकास परिषदचे संस्थापक अध्यक्ष गणेश हाके यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली आहे. यावेळी सचिव हनुमंत देवकते, तालुका अध्यक्ष अनिल पुजारी, वैजनाथ लवटे, करण हाके, अनिकेत शेंडगे, नयुम शेख आदी उपस्थित होते. मदने यांच्या निवडीबद्दल अभिनंदन अनिल पुजारी, संतोष मदने, प्रदीप काळे, वैजनाथ लवटे, विकास गिरी, मुन्ना हासमी, शिवम हाके, गणेश शेंडगे, जीत सोलकर, शुभम काळे, सिधु खंडेकर आदी नेत्यांचे अभिनंदन केले आहे.

0 Comments