Latest News

6/recent/ticker-posts

दोषी अधिकाऱ्यांची CID चौकशी करून गुन्हे दाखल करा;अनिल मुळे आत्महत्या प्रकरणी तहसिलदारांना निवेदन

दोषी अधिकाऱ्यांची CID चौकशी करून गुन्हे दाखल करा;अनिल मुळे आत्महत्या प्रकरणी तहसिलदारांना निवेदन


प्रशांत तांबोळकर 

शिरूरअनंतपाळ:  तोंडार ता. उदगीर येथील सुपुत्र व अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल मुळे यांच्या आत्महत्या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शिरूरअनंतपाळ तालुक्यातील ग्रामस्थ व विविध सामाजिक संघटना आणि आणि सर्वपक्षीय नेत्यांनी तहसिलदार यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे. तहसिलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे, की पोलिस अधिकाऱ्यांच्या वतीने बदनामी करण्याच्या उद्देशाने जाणीवपुर्वक एका महिलेला त्यांच्या विरोधात महिला तक्रार निवारण केंद्रात तक्रार द्यायला लावली. या प्रकरणात दोषी नसतानाही त्यांची बाजूं ऐकून न घेता त्यांची वेतनवाढ रोखून त्यांच्या प्रमोशनला अडथळा निर्माण केला. त्या महिलेची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक मेश्राम व डीसीपी सातव यांनी पीआय मुळे यांची वेतन वाढ रोखून बदनामी करून मानसिक त्रास दिला. त्यांची सीआयडी चौकशी करून त्यांना निलंबित करावे, १४ ऑगस्ट रोजी आत्महत्या केल्यानंतर त्याच रात्री अणिल मुळे यांच्या निवासस्थानी जाऊन बेकायदेशीरपणे त्यांचे लॅपटॉप व इतर साहित्य जप्त केले, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जाणून-बुजून ती जप्ती केली व त्यातील सर्व पुरावे नष्ट केले, त्या लॅपटॉपची छेडछाड करण्यात आली. त्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, त्यांच्या मोबाईलची सर्व माहिती व सीडीआर तपासावे त्यांनी आत्महत्या केली असे असले तरी त्यांचा घातपात व खून असु शकतो. याबाबत कसून चौकशी करण्यात यावी, अनिल मुळे यांना प्रचंड मानसिक त्रास दिला असल्याने त्यांनी आत्महत्या केली त्या अगोदर नक्की सुसाईड नोट लिहून ठेवली असेल मात्र ती नष्ट करण्यात आली असावी त्याचा तपास करण्यात यावा, यात नेमण्यात आलेले तपास अधिकारी एसीपी दर्जाचे असून ते वरिष्ठांची चौकशी कशी करू शकतात असा सवालही निवेदनकर्त्यांनी उपस्थित केला आहे. तपास अधिकारी गायकवाड यांनी अमरावती येथील सोशल मीडिया व्हाट्सअप ग्रुपवर अनिल मुळे यांच्या विरोधात काही कागदपत्र वायरल केले आहेत. त्यांचे स्क्रीनशाॅट सुद्धा काढून ठेवण्यात आले आहेत. तपास अधिकारी यांनी हे करणे योग्य आहे का ? तपास हाती येताच तक्रारीत तथ्य नसल्याची घोषणा केली, नातेवाईकांचे जवाब घेण्यापूर्वीच तथ्य नसल्याचे सांगणारे तपास अधिकारी गायकवाड यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. अशा विविध पंचवीस मागण्या या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.या निवेदनावर विरभद्र भातांब्रे, संतोष ऊर्फ बाळू शिवणे, महादेव आवाळे, संदिप धुमाळे, सुचित लासूने, उदय बावगे, ओम डिगोळे, निखील सिंदाळकर, एकनाथ पौळकर, बस्वराज रायवाडे, मंगेश लांडगे, प्रतिक पारशट्टे, तानाजी फुलारी, महादेव अब्दुलपुरे, तानाजी वलांडे यांच्यासह विविध सामाजीक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

0 Comments