वलांडी येथे विविध विकासकामांचे लोकार्पण
वलांडी: येथील ग्रामपंचायत च्या वतीने प्रभाग क्रमांक 2 मधील अंगणवाडीची इमारत, वाल्मिकी चौक ते राचोटेश्वर देवस्थान पर्यंतचा सिमेंट रस्ता आणि लोकसहभागातून निर्मित ग्रीन वलांडी मोहिमेअंतर्गत लावण्यात आलेल्या झाडांचे लोकार्पण भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून करण्यात आले. वलांडी येथील वाल्मिक चौकात जीर्ण झालेली आणि दुरावस्थेत असलेली अंगणवाडीचा पुनर्विकास करून नवीन वस्तू निर्माण करून त्याला बालाउपक्रम अंतर्गत रंगरंगोटी करून एक सुंदर अशी भव्य इमारत उभारण्यात आली त्याचे उदघाटन आणि लोकार्पण देवणीचे तहसीलदार सुरेश घोळवे, गटविकास अधिकारी मनोज राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. वाल्मिकी चौक ते राचोटेश्वर मंदिर देवस्थान पर्यंत बनवण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याचे लोकार्पण ही या वेळी करण्यात आले. नवीन बनवण्यात आलेल्या रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावून त्यांना संरक्षक जाळी बसवून झाडे जगवण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या ग्रीन वलांडी या उपक्रमाचे उदघाटन या वेळी करण्यात आले. या प्रसंगी विस्तार अधिकारी येडले, सरपंच सौ. राणीताई भंडारे, उपसरपंच प्रा. महमूद सौदागर, माजी सरपंच रामभाऊ भंडारे, ग्रामविकास अधिकारी केंद्रे, रवी स्वामी, महेश बंग, मुश्ताक कादरी, रवी गायकवाड, संदीप जगताप, कल्याण बनाळे, दिगंबर गुरव, सुनील चिल्लरगे, धनराज बिरादार, शिवा जगताप, शादुल बौडीवाले, धनराज बनसोडे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
बाला उपक्रम अंतर्गत कायापालट झालेल्या जि. प. शाळेत शाळा एक मॉडेल आणि डिजिटल करण्यासाठी श्री संजय कटके, सोमनाथ स्वामी आणि रामभाऊ भंडारे यांच्या वतीने शाळेला प्रत्येकी एक एलईडी टीव्ही संच देण्यात आले.


0 Comments