कोकळगाव मध्ये मोहरम उत्सवास प्रारंभ
मदनसुरी:(प्रतिनिधी/द्रोणाचार्य कोळी) हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारा सण म्हणजेच मोहरम या उत्सवास प्रारंभ झालेला असून, निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथे 65 वर्षांपासून पीर बसवले जातात, न्यालयाद्री, पंजायतन, अली अकबर, बीर फातिमा, बाराइमाम, मछलीपीर (नवगिरी),नालासा, हुसेनपाषा, इत्यादी नावाचे पीर(देव) बसले आहेत. पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात संपूर्ण गावचे तोरण, भात, मलिदाचे नैवद्य दाखवले जाते. रात्रभर धुला, पवित्रा असे खेळ सर्वधर्मसमभाव मिळून खेळले जाते. आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवाला नवस पूर्ण केले जातात. बाहेरील पंचक्रोशीतील भाविक भक्त नवस पूर्ण करण्यासाठी कोकळगाव येथील मोहरम उत्सवास येतात.

0 Comments