नळेगाव येथे कै. नरसिंगराव चव्हाण विद्यालयात ई-पीक पाहणी अँपचे मार्गदर्शन
नळेगाव:(प्रतिनिधी/ळासाहेब बरचे) नळेगाव येथील कै. नरसिंगराव चव्हाण विद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या ई-पिक पाहणी या अँप संबंधात 8 वी ते 10 वीच्या विध्यार्थ्यांना नळेगावचे तलाठी अविनाश पवार यांनी सखोल अशी माहिती यांच्यामार्फत देण्यात आली. महसूल व कृषी विभागाच्या वतीने शासनाच्या या नवीन योजनेची गावागावात अंमलबजावणी केली जाणार आहे. या अँपमुळे शासनाच्या प्रत्येक योजनेला म्हणजेच पीक विमा, पीककर्ज, अनुदान असेल किंवा अन्य योजना असतील या सर्वांसाठी सातबारा व पिकपेरा हे कागदपत्र आवश्यकच असते. सध्या पिकपेरा हा त्या गावचे तलाठी यांच्याकडून लेखी स्वरूपात घ्यावा लागतो, मात्र या अँपमुळे शेतकरी बांधवांना आपल्या शेतातील पिकांची नोंद स्वतः भरता येणार आहे. या वर्षी स्वातंत्र दिनानिमित्त या अँपचे उदघाटन करण्यात आले. प्रत्येक शेतकरी त्यांच्या शेतात पेरलेल्या पिकांची नोंद, बांधावरील झाडांची नोंद,फळबाग नोंद स्वतः मोबाईल अँप वरून करू शकणार आहेत. नोंदीवरूनच पुढील सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडणार आहेत. त्यामुळे सर्वांनी हे अँप घेऊन आपला पीक पेरा नोंदविण्याचे आवाहन तलाठी अविनाश पवार यांनी कै. नरसिंगराव चव्हाण विद्यालयातील विध्यार्थ्यांना केले. एका मोबाईल वरून 20 शेतकऱ्यांना पीक नोंद करता येणार आहे. म्हणजे ज्याच्या कडे मोबाईल नाही त्यांनी इतरांकडून पिकपेरा नोंद करून घेता येणार आहे. पिकांची सातबारामध्ये स्वतः नोंद करता येणार आहे. त्याच बरोबर आता स्वयंघोषणा पिकपेरा हि संकल्पना बंद होऊन आपल्या सातबारा वरती आपण स्वतः नोंद करणे सुलभ झाले आहे. अशी माहिती देण्याती आली. या अँप संदर्भात विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना व नातेवाईकांना माहिती देण्याचे आवाहन केले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक चेतन चव्हाण, दैनिक इशाराचे संपादक के.वाय. पटवेकर, अशीहारा कराटे असोसिएशन लातूर चे सचिव संतोष तेलंगे व सर्व शिक्षक,शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments