केळगाव येथील आनंदमुनी उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिन साजरा
निलंगा:(विशेष प्रतिनिधी/इरफान शेख) निलंगा तालुक्यातील केळगाव येथील आनंदमुनी उच्च माध्यमिक विद्यालयात दि. 5 सप्टेंबर रोजी भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्यकारणी सदस्य सूर्यकांतराव पाटील हे होते तर यावेळी संस्था सचिव प्रकाशराव अट्टरगेकर, कोषाअध्यक्ष विजयकुमार पाटील, विलासराव गवारे, प्रमोद अट्टरगेकर, प्राचार्य सिद्राम मिटकरी व कर्मचारी उपस्थित होते.

0 Comments