Latest News

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या

शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या


निलंगा:(विशेष प्रतिनिधी/इरफान शेख) निलंगा तालुक्यात व राज्यात अचानक झालेल्या अतिवृष्टी व गुलाब चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन, ऊस व पशुधन तसेच इतर पिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले सोयाबीन पीक पाण्यामुळे मुळा कुजल्या आहेत तसेच त्याला मोड फुटून पीक वाया गेले आहे व अनेक ठिकाणी शेतात पाणी थांबून पिकांचे नुकसान झाले आहे, व ऊस पीक अतिवृष्टीमुळे मोडून आडवे पडले आहेत यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून त्यांचा संसार उघड्यावर आला आहे, शेतकऱ्यांना यातून उभारी मिळणे आवश्यक आहे, शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून तो जगला तर राष्ट्र जगेल यास्तव अतिवृष्टीचा तडाखा बसल्यामुळे पंचनामे न करता सर्व शेतकऱ्यांना सरसकट सोयाबीन व इतर पिकांसाठी एकरी 50 हजार व बागायती साठी एकरी 1 लाख रुपये नुकसानभरपाई अनुदान स्वरूपात त्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करावी व शेतकऱ्यांना या आर्थिक विवंचनेतून व आस्मानी नैसर्गिक संकटातून बाहेर काढण्यासाठी उपजिल्हाधिकारी मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना कळवून शेतकऱ्यांना न्याय देण्याबाबद अवगत करावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. अन्यथा मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, विरभगतसिंग विद्यार्थी परिषद यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची शासन व प्रशासन यांनी नोंद घ्यावी असे निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष जाधव एम एम, जिल्हा संघटक विनोद सोनवणे, तालुका सचिव आर के नेलवाडे, शहराध्यक्ष डॉ.उद्धव जाधव, डॉ.सचिन बसुदे, ऍड. तिरुपती शिंदे, इंजि. मोहन घोरपडे, पत्रकार संजय इंगळे, माधव गाडीवान, प्रकाश सगरे, सुबोध गाडीवान, कुलदीप सूर्यवंशी, संजय तांबोळे, बंटी देशमुख, सचिन नाईकवाडे, अमर थेटे आदीं जणांच्या स्वाक्षरी आहेत.

Post a Comment

0 Comments