Latest News

6/recent/ticker-posts

भादेकर भूमीपुत्राने कोल्हापुरात लावला ज्ञानाचा दिवा;शिक्षकांचा केला शाहूनगरीत सन्मान

भादेकर भूमीपुत्राने कोल्हापुरात लावला ज्ञानाचा दिवा;शिक्षकांचा केला शाहूनगरीत सन्मान


बी डी उबाळे

औसा: प्रतिवर्षी साई समर्थ फाउंडेशन(जयसिंगपूर कोल्हापूर) ही संस्था राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराचे आयोजन करत असते. भादा येथील भूमिपुत्र विनोद सावंत हे साई समर्थ फाउंडेशन सोलापूरचे जिल्हाध्यक्ष असून ते नेहमी अशा पुरस्काराचे आयोजन करतात. त्यांनी महाराष्ट्रातील सन 2018 मध्ये  52 मान्यवर , 2019 मध्ये 29 मान्यवर व 5 सप्टेंबर 2021 रोजी 40 अशा महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कार्य करण्याऱ्या शिक्षक व इतर मान्यवर याना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक, गुणवंत शिक्षक, जीवनगौरव,समाजभूषण , कर्मभूषण असे विविध पुरस्कार त्यांनी त्यांच्या संस्थेमार्फत देऊन प्रामाणिकपणे काम करण्याऱ्या व्यक्तींच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन इतरांना प्रेरित करण्याचे काम करत आहेत. अशा विविध पुरस्काराच्या कार्यक्रमामध्ये त्यांना खंबीरपणे साथ देणारे संतोष ढवळे संस्थापक अध्यक्ष तथा संयोजक तसेच पूनम ढवळे सचिव, वनिता साबणे, आप्पासाहेब माळी यांचे सहकार्य मोलाचे आहे. नुकतीच विनोद सावंत यांची लातूरच्या आंतरराष्ट्रीय मानवाधिकार जिल्हाध्यक्ष पदी निवड झाली असून ते विविध सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. त्यांनी पूरग्रस्तांना मदत केली आणि आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलीस  भांडे भेट दिले आहेत. अशी त्यांनी समाजसेवेची गती वाढविण्यास सुरुवात केली आहे.

Post a Comment

0 Comments