Latest News

6/recent/ticker-posts

मदनसुरी परिसरात बैलपोळा साजरा

मदनसुरी परिसरात बैलपोळा साजरा


मदनसुरी:(प्रतिनिधी/द्रोणाचार्य कोळी) भारत देश हा कृषिप्रधान देश असल्याने बळीराजा सोबत वर्षभर राबणाऱ्या बैलाचे बैल पोळ्याच्या दिवशी आकर्षक सजावटीसह मोठ्या थाटात पण कोरोनाच्या सावटाखाली पूजन करण्यात आले. बैल पोळ्याच्या आदल्या दिवशी, खंड मळणी असते या दिवशी या दिवशी बैलाला आमंत्रण देऊन बळीराजा आपले बैल धुतले. व बैल पोळ्याच्या दिवशी दिवसभर बैलाला कामाला न जुंपता आराम ठेवून त्याची आकर्षक सजावट केली. बैलाचा खांदा व मान याला तेलाने व हळदीने मालिश करून डोक्याला बाशिंग, फुगे, रिबीन, गळ्यात कवड्या घुंगराच्या माळा घालून, नवे वेसण, नवी दोरी बांधून पायात तोडे सह आकर्षक गेरूचे ठिपके देऊन, बैलास झुलयांनी सजवून त्याला गावातील हनुमान मंदिरात वाजतगाजत नेऊन परत घरी आणले. बळीराजा व बळीराजाच्या सुवासींनी भगिनी बैलाची यथोचित विधिवत पूजा करून, त्याला पूर्ण पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आले.व बैलापुढे गहू,ज्वारीचे रास मांडून त्याची ओवाळणीही केली. अतिथी देवो भव म्हणून शेतकर्यांसोबत राबणाऱ्या शेतकऱ्याचा सखा, सर्जा राजा प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा  उत्सव म्हणजेच बैलपोळा. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा हा उत्सव मोठ्या उत्स्फूर्त वातावरणात साजरा करण्यात आला.

Post a Comment

0 Comments