Latest News

6/recent/ticker-posts

यंदाचा गणेशोत्सव मिरवणुकी विना साजरा करणार

यंदाचा गणेशोत्सव मिरवणुकी विना साजरा करणार


ऑनलाइन उत्सव साजरा करण्याचे उपसरपंच बडे यांचे आवाहन

मदनसुरी:(प्रतिनिधी/द्रोणाचार्य कोळी) कोविड आजाराच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव कासार सिरसी सह परिसरात पोलिसांच्या आदेशाचे पालन करत मिरवणुका न काढता गणेश साजरा करण्याचा निर्णय येथील शांतता कमिटीच्या वतीने घेण्यात आला याप्रसंगी शहरातील गणेश मंडळाचे पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक व्यापारी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थीत होते यावर्षी च्या उत्सवात मंडळाने महाआरती व संस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण ऑनलाइनच्या माध्यमातून करावे असे आवाहन येथील उपसरपंच तथा शांतता कमिटीचे अध्यक्ष बडे लक्कडहारे यांनी केले. गौरी गणपती सह यानंतर येणाऱ्या सर्वच सार्वजनिक सण समारंभ शांततेत पण भक्तिभावाने साजरे व्हावे यासाठी येथील पोलीस ठाण्यात निलंगा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली या बैठकीस परिसरातील पोलीस पाटलांसह नागरिकांचा उत्तम प्रतिसाद दिसून आला. या बैठकीस गणेश मंडळाचे पदाधिकारी जगन जगदाळे, सचिन करणे, वीरेश चिंचणसुरे, सागर देवसाळे, किरण किवळे, बालाजी भोसले, नारायण डोंबाळे यांचेसह ग्रामपंचायत सदस्य विवेक कोकणे, ईश्वर पांचाळ यांची उपस्थिती होती. या बैठकीत शांतता कमिटीच्या अध्यक्षपदी येथील उपसरपंच बर्डे साहेब लक्कडहारे यांची अध्यक्षपदी तर धनराज होळकुंदे यांची उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली असून यासाठी एक ते वीस सदस्यांची निवड करण्यात आली आहे. नियमभंग करणाऱ्या मंडळा विरुद्ध कडक कारवाईचा इशारा पोलिसांच्या वतीने देण्यात आला असून सर्व नियमांचे पालन करत गणेश उत्सव साजरा करणाऱ्या गणेश मंडळात पोलिसांच्या वतीने प्रथम पाच हजार रुपये रोख पारितोषिक तर द्वितीय मंडळास ग्रामपंचायतीच्या वतीने 3100 रुपयाचे पारितोषिक तर तृतीय पारितोषिक 2100 रुपये गणेश मंडळास पंचायत समिती सदस्य जिलानी बागवान यांच्या वतीने जाहीर करण्यात आले असून हा रॉक निधी येथील कन्या शाळेत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments