Latest News

6/recent/ticker-posts

कासार सिरसी येथे शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा गौरव

कासार सिरसी येथे शिक्षक दिनानिमित्त  शिक्षकांचा गौरव


मदनसुरी:(प्रतिनिधी/द्रोणाचार्य कोळी) निलंगा तालुक्यातील कासार सिरसी येथे श्री करीबसवेश्वर उच्च माध्यमिक व माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिनानिमित्त  सर्व शिक्षकांचा संस्थेचे संचालक श्याम मूळजकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कासार शिरशी येथील श्री करीबसवेश्वर विद्यालयाच्या प्राचार्य सौ सविता मुरूमकर यांना उपक्रमशील मुख्याध्यापक म्हणून गौरवण्यात आले व त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यात आला शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षिका यांना संचालक मूळशंकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यात सह शिक्षकांना  सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे श्याम मुळजकर म्हणाले की शिलवंत, क्षमावंत व कलावंत या तीन गुणांचा समन्वय ज्यांच्या अंगी आहे तेच खरे गुरु असे जे आहेत त्यांच्या चरणांकडे आपले हात आपोआपच जातात अशा शब्दात त्याने शिक्षका प्रती आपल्या भावना व्यक्त केले. कांबळे मॅडम यांच्या मधुर गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Post a Comment

0 Comments