कलांडी येथे निटूर पोलिसांचा छापा अवैध दारूचा साटा केला जप्त
निलंगा:{ प्रतिनिधी/रमेश लांबोटे } तालुक्यातील कलांडी येथे मागील अनेक वर्षांपासून अवैध देशी दारू विक्री केली जात होती ही माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी 5 सप्टेंबर शनिवारी कलांडी येते निटुर पोलिस चौकीचे बीट अमलदार सत्यवान कांबळे व त्यांचे सहकारी पो.काॅ.शिवानंद गीरबोने, पो.काॅ.हरिभाऊ कांबळवाड यांच्या पथकाने छापा मारून आरोपी अंकुश वाघमारे यांच्या घरामागे देशी दारू सिमला संत्रा कंपनीच्या 180 ML सील बंद सोळा बाटल्या प्रति बाटली साठ रुपये प्रमाणे एकूण 960 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करून पुढील तपास पोलिस चौकीचे बीट अंमलदार सत्यवान कांबळे करीत आहेत.

0 Comments