Latest News

6/recent/ticker-posts

चांभारगे विठ्ठल व मोमीन मुमताज यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान

चांभारगे विठ्ठल व मोमीन मुमताज यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान


केळगाव:( प्रतिनिधी/वसीम मुजावर ) दि. -  05 सप्टेंबर रोजी जि प प्रा शा केळगाव येथे सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली, यावेळी गावाचे तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष कांबळे यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले. प्रत्येकवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा शाळेतील प्राथमिक शिक्षक चांभारगे विठ्ठल व  श्रीमती. मोमीन मुमताज यांचा शालेय व्यवस्थापन समिती तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी ग्रामपंचायत सदस्य भम्पू चव्हाण तसेच शा व्य स उपाध्यक्ष भिकाजी काळे, शिक्षण प्रेमी जावेद मुजावर व विद्यार्थी तसेच मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments