महाराष्ट्र महाविद्यालयातील बि.व्होक. अभ्यासक्रमाच्या २३ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये नियूक्ती
निलंगा:( विशेष प्रतिनिधी/इरफान शेख ) येथील महाराष्ट्र महाविद्यालयाच्या बि.व्होक. या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या २३ विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील विविध नामांकित कंपन्यांमध्ये नियूक्ती मिळाली आहे. याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने या नौकरी प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून बि.व्होक. या कौशल्याभिमुख व्यावसायिक अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आली असून या अभ्यासक्रमाचे हे तिसरे वर्ष होय. विशेष बाब म्हणजे या पदवी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षाच्या सहाव्या सत्रात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण होताच महाराष्ट्रातील विविध नामांकित कंपन्यांमध्ये ही नियुक्ती प्राप्त झाली आहे. विद्यार्थ्यांच्या या उपलब्धी बद्दल महाविद्यालयात हा विशेष सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजयकुमार पाटील निलंगेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपूके हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक बि. व्होकचे नोडल ऑफिसर डॉ. मिलिंद चौधरी यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना माननीय विजय पाटील निलंगेकर यांनी नोकरी प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपूके यांनीही याप्रसंगी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी नौकरी प्राप्त विद्यार्थी व त्यांचे पालक यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. या सत्कार समारंभाच्या यशस्वीतेसाठी बि. व्होक. या व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रा. पंकज पवार, प्रा. श्रीनिवास काकडे, प्रा. अभिमन्यू गंगाजी, प्रा. राजेश जाधव, आणि प्रा. सोनम पाटील यांनी या विद्यार्थ्यांच्या यशात मोलाची भूमिका बजावली. त्याबद्दल त्यांचेही विशेष कौतूक याप्रसंगी करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक श्रीनिवास काकडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. सोनम पाटील यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोहर एखंडे, बि.व्होक प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
0 Comments