Latest News

6/recent/ticker-posts

निलंगा तालुका महाविकास आघाडीच्या वतीने निलंगा बंदचे आवाहान

निलंगा तालुका महाविकास आघाडीच्या वतीने निलंगा बंदचे आवाहान


निलंगा:( विशेष प्रतिनिधी/इरफान शेख ) लखीमपूर येथे शेतकऱ्यांवर गाडी घालून चिरडून ठार मारणाऱ्या मंत्रिपुत्रास तात्काळ अटक करून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या महासचिव प्रियांका गांधी व विरोधी नेत्यांना अटक करून डांबून ठेवणाऱ्या अधिकारी यांच्या वर तात्काळ कार्यवाही करून त्यांना निलंबित करण्यात यावे. आर्यन खान प्रमाणेच 3000 किलो ड्रग्स सापडल्या प्रकरणी बंदराचे मालक अदानीवर कार्यवाही करण्यात यावी. आदी मागण्याच्या निषेधार्थ दिनांक 11/10/2021 रोजी निलंगा बंदचे आवाहन निलंगा तालुका महाविकास आघाडी च्या वतीने महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, महाराष्ट्र प्रदेशचे सचिव अभय साळुंके, तालुका शिवसेना प्रमुख अविनाश रेशमे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विजय पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस चे शहरअध्यक्ष इस्माईल लदाफ, अशोकराव पाटील मित्र मंडळाचे अध्यक्ष दयानंद चोपणे, शिवसेनेचे जिल्हाउपप्रमुख ईश्वर पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय सेल लक्ष्मण कांबळे, काँग्रेस जिल्हाउपाध्यक्ष सुधाकर पाटील, युवक काँग्रेसचे सरचिटणीस अमोल सोनकांबळे, युवा सेनेचे तालुकाअध्यक्ष प्रशांत वंजारवाडे, अनुसुचित सेलचे गिरीश पात्रे, महेश चव्हाण, गोविंद सूर्यवंशी, विलास मुगळे, नवनाथ कुडुंबले, शकील पटेल, माधव पाटील, दीपक कुंडे, सोमनाथ कदम, प्रभाकर मुडे, बंजरंग कांबळे आदीने शासकीय विश्राम गृह येथे झालेल्या बैठकीत आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments