निलंगा येथील मस्जिदीत मिशन कवच कुंडल अंतर्गत लसीकरण
निलंगा:(विशेष प्रतिनिधी/इरफान शेख ) मिशन कवच कुंडल अंतर्गत निलंगा शहरातील ईदगाह मस्जिद शिवाजी चौक,व बिलाल मस्जिद शिवाजी नगर येथे लसीकरण मोहीम घेण्यात आली. यात 230 पेक्षा अधिक मुस्लिम समाजातील नागरिकांनी लसीकरण करून घेतले. कोविडशिल्ड या लसीचा लसीकरण करण्यात आले .जवळपास सर्वांना प्रथम लसीचा डोस देण्यात आला. या लसीकरण केंद्राला तहसीलदार गणेश जाधव यांनी भेट दिली. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष हमीद शेख, माजी सभापती तथा नगरसेवक इरफान सय्यद, राष्ट्रवादी काँग्रेसचे इस्माईल लदाफ, हसन चाऊस, नसीमोद्दीन खतीब, अलवी जाफर, मस्जिद चे इमाम मुफ्ती रिजवान, मोईज सितारी, आयुब बागवान आदी उपस्थित होते. या लसीकरण मोहिमेत उपजिल्हा रुग्णालयातील डॉ.शहाबाज वाढवणे, अमजद पठाण, ज्ञानेश्वर ढेपे, अतुल शिंदे यांनी परिश्रम घेतले.
0 Comments