Latest News

6/recent/ticker-posts

पोलीस स्मृती दिनानिमित्त शहीद जवानाच्या परिवारांची भेट

पोलीस स्मृती दिनानिमित्त शहीद जवानाच्या परिवारांची भेट


कुर्डूवाडी: दि. 21 कायदा व सुव्यवस्था, नागरीकांच्या जिवीताचे व मालमत्तेचे संरक्षण व इतर राष्ट्रीय कर्तव्य बजावत असतांना पोलीस खात्यातील तसेच संरक्षण विभागातील अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपले सर्वस्व पणाला लावून विरगती प्राप्त केली आहे. घाटणे येथील शहीद म्हंकाळ गाडे जवान कर्तव्य बजावतांना विरगती प्राप्त झाले होते. आज पोलीस स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या परिवारातील सदस्यांची भेट घेऊन कुर्डूवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत बोधे यांनी शहीद झालेल्या जवानाच्या नावाचा गौरावाने उल्लेख केला व त्यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. यावेळी कुर्डूवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस हवलदार हरिदास बोराटे, हरिश्चंद्र पाटील उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments