डॉ.श्रीधर अहंकारी यांच्या वाढदिवसानिमित्त यकृत तपासणी शिबिर उत्साहात;अनेक रुग्णाच्या झाल्या तपासण्या
अंबुलगा:( प्रतिनिधी/भरत चव्हाण ) शहरातील सुप्रसिद्ध एमडी मेडिसिन तज्ञ डॉ. श्रीधर अहंकारी यांच्या वाढदिवसा निमित्त आज शुक्रवारी सुश्रुत हॉस्पिटल मध्ये यकृताच्या विविध तपासन्यांचे शिबिर संपन्न झाले. अनेकांच्या रक्ताचे नमुने घेऊन मुंबईला यकृताची तपासणी करण्यासाठी पाठवण्यात आले. या शिबिरांमध्ये डॉ. अहंकारी यांनी रुग्णांची तपासणी केली त्यांना सहकार्य करण्यासाठी केशव बोबडे हे सुद्धा होते. यावेळी डॉ. अहंकारी यांना शुभेच्छा देण्यासाठी निलंगा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष मल्लिकार्जुन कोळे, माझी बांधकाम सभापती तथा नगरसेवक शरद पेठकर, काँग्रेस पक्षाचे लाला पटेल, भाजपचे निलंगा सोशल मीडिया प्रमुख सुमित इनानी, सामाजिक कार्यकर्ते रमेश लांबोटे, सुनील जाधव , साहेबराव हरणे, योगेश साळुंके, भैय्या पाटील, इंटास फार्मा कंपनी एबीएम प्रशांत देशमुख, दीपक कर्मा पुरे यांनीही शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. यावेळी रुग्णालयातील परिचारिका व सहाय्यक कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. तालुक्यातील अनेक रुग्णांनी या तपासणी शिबिराचा लाभ घेतला.
0 Comments