सामान्य जनतेची कामे करा शिवसेना आपल्या पाठीशी- जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने
देवणी:( विशेष प्रतिनिधी/इरफान शेख) देवणी तालुक्यातील अचवला या गावी 100 युवकाचा शिवसेनेत प्रवेश देण्यात आला व शिवसेना शाखेचे उद्घाटन करण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या सूचनेनुसार "गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक" या संकल्पनेतून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली आहे. अचवला या गावी शिवसेनेची शाखा स्थापन करण्यात आली. यावेळी गावातील सर्व सार्वत्रिक कामे करून देणार व सर्व शिवसैनिकांनी शेतकऱ्यांच्या अनेक समस्या असतात त्या सर्व समस्या सोडवण्याचे काम करा शिवसेना आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असे मत शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी व्यक्त केले. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा ज्येष्ठ समाजसेवक लिंबन महाराज रेशमे यानी अपल्या गावातील पानंद रस्ते, शिव रस्ते इत्यादी संबंधीचा प्रस्ताव दाखल करा तो प्रस्ताव पालकमंत्र्यांच्या मार्फत मंजूर करून तुम्हाला देईन असे वचन दिले. या कार्यक्रमात देवा ग्रुपचे तालुकाप्रमुख कृष्णाजी वजनम यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश घेतला या कार्यक्रमाच्या वेळी देवनीचे शिवसेना तालुकाप्रमुख पंडित अण्णा भंडारी, निलंगा शिवसेना तालुकाप्रमुख अविनाश रेशमे, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. आण्णासाहेब मिरगाळे, सुनील नाईकवाडे, सोमेश्वर धानुरे, यशवंत ठाकरे, कृष्णा इंगोले, दत्ता बिराजदार, मुकेश सुडे, लक्ष्मण बिराजदार, अमोल भोसले, मुक्तार तांबोळी इत्यादी अनेक पदाधिकारी तसेच शिवसैनिक उपस्थित होते. शिवसेनेचे शाखाप्रमुख तिरुपती बेद्रे, गोपाळ शिंदे, माधव सावळे, प्रदीप पाटील, अनिल सूर्यवंशी, परमेश्वर कांबळे, दौलत बिरादार, ज्ञानेश्वर पवार, अरविंद सूर्यवंशी, गोविंद बोबडे, बालाजी बादलगावे तसेच शिवसेना विभागप्रमुख विष्णू दत्तात्रय बण यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
0 Comments