गिरकचाळ येथे मांजरा नदीपात्रात आढळले अज्ञात व्यक्तीचे प्रेत
शिरोळ:( प्रतिनिधी/सलीमभाई पठाण ) मांजरा नदीपात्रात गिरकचाळ येथे कोल्हापुरी बंधाऱ्यात आज दि.24/10/21 रोजी अज्ञात व्यक्तीचे प्रेत आढळले आहे.सदर पुरुष जातीचे प्रेत असुन पाण्यात फुगलेल्या अवस्थेत आहे. मयताची ओळख अद्याप पटलेली नाही. सदर व्यक्तीचा घातपात की अन्य काही हे तपासाअंती निष्पन्न होईल. पोलीस प्रशासनाला याची माहिती देण्यात आली आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच पुढील तपास आणी सदर व्यक्तीची ओळख स्पष्ट होईल. निटुर पोलीस चौकीचे बीट अंमलदार सत्यवान कांबळे हे पुढील तपास करीत आहेत.
0 Comments