Latest News

6/recent/ticker-posts

खा.ओमराजे निंबाळकर यांनी केली तेरणा काठी असलेल्या अतिवृष्टी ग्रस्त गावची पाहणी

खा.ओमराजे निंबाळकर यांनी केली तेरणा काठी असलेल्या अतिवृष्टी ग्रस्त गावची पाहणी


मदनसुरी:( प्रतिनिधी/द्रोणाचार्य कोळी ) शनिवार दि. 2 ऑक्टोम्बर रोजी खा.ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी औसा विधानसभा मतदार संघातील गावांमध्ये भेट देऊन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सोयाबीन पिकांची पाहणी केली. यावेळी माजी जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी, निलंगा येथील उपविभागीय अधिकारी शोभा जाधव, तहसीलदार गणेश जाधव, औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभपती किशोर जाधव, माजी उप सभापती श्रीमंत मेहकरे, डॉ.सचिन सगर, कृषी अधिकारी तलाठी व ग्रामसेवक यांची उपस्थिती होती. औसा तालुक्यातील उजनी,आशिव, मातोळा, सारणी, नांदुर्गा, गुबाळ, किल्लारी व निलंगा तालुक्यातील नदीहत्तरगा, कोकळगाव, रामतीर्थ मदनसुरी, लिंबाळा, चिंचोली, येळनूर, धानोरा बामणी, पिंपळवाडी, सांगवी आदी गावांमध्ये भेट दिली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ताबडतोब विमा कंपनीला आपापल्या शेतातील  नुकसान झालेल्या सोयाबीन पिकांबाबत माहिती कळवावे. नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त प्रमाणात नुकसान भरपाई मिळण्याबाबत सर्वांनी प्रयत्न करण्याच्या सूचना यावेळी खासदार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास झालेल्या अतिवृष्टीमुळे हिरावून घेतला आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळण्यासाठी प्रत्येकाने आपल्या झालेल्या नुकसानीच्या ऑनलाईन तक्रारी किंवा ज्यांच्या ऑनलाईन होत नाहीत त्यांनी ऑफलाईन तक्रारी करून आपल्या पिकांचे पंचनामे करून घेण्याबाबत सूचना दिल्या. महसूल मंडळातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे योग्य प्रमाणात पंचनामे करावेत. त्यासोबतच ज्या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमीन खरडून गेलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांनी मदतीसाठी वेगळे पंचनामे करण्याबाबतही ओमराजे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments