Latest News

6/recent/ticker-posts

विविध उपक्रमाने कासार सिरसी येथे आंतरराष्ट्रीय वृद्ध दिन साजरा

विविध उपक्रमाने कासार सिरसी येथे आंतरराष्ट्रीय वृद्ध दिन साजरा


कासार सिरसी:( प्रतिनिधी/फिरोज जागीरदार ) कासार सिरसी येथील आधार वृद्धाश्रमात आंतरराष्ट्रीय वृद्ध दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन लातूरचे माजी खासदार सुनील गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरातील ज्येष्ठ नागरिकांचा गौरव आरोग्य तपासणी शिबिर आश्रमातील वृद्धांना कपड्यांचे वाटप व भोजनाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमास शहरातील ज्येष्ठ नागरिकातून उत्तम प्रतिसाद दिसून आला एकता बहुउद्देशीय महिला मंडळ द्वारा संचलित चालवण्यात येणाऱ्या आधार वृद्धाश्रमात आंतरराष्ट्रीय वृद्ध दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कासार सिरसी चे सुपुत्र लातूरचे माजी खासदार सुनील गायकवाड यांच्या हस्ते जेष्ठ नागरिक नागप्‍पा होळकुंदे, प्रदीप होळकुंदे, रामनिला मडोळ, नागराळे बसप्पा, होळकुंदे सुरेश, विजापूरे, ज्येष्ठ पत्रकार श्याम मूळजकर आदींचा सत्कार करण्यात आला वृद्ध आश्रमाचे अध्यक्ष मनीषा होळकुंदे यांच्या हस्ते प्रमुख अतिथी सुनील गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला समारंभाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर मडोळे यांनी केले आपल्या मार्गदर्शनपर भाषणात गायकवाड म्हणाले की 'मातृ देवो भव। पितृ देवो भव। ही या देशातील जुनी शिकवण आहे तिचा विसर पडू नये यासाठी असे स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत आहेत असे सांगत ते म्हणाले की जगाच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानात भारताचा 71 वा क्रमांक लागतो हे दुर्दैव नमूद करत ज्येष्ठ नागरिकांचा आदर करण्याचे त्यांनी आवाहन केले याप्रसंगी यांच्या हस्ते आश्रमातील वृद्धांना कपडे वाटप करण्यात आले तर ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने त्यांची तपासणी करण्यात आली कोरोना चा धोका अद्याप संपलेला नाही या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता विचारात घेत सर्वांनी ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्याचे आवाहन करत या आश्रमात राबवण्यात येणाऱ्या सर्वच उपक्रमांचे कौतुक गायकवाड यांनी केले या समारंभास मोनेश्वर पांचाळ, ग्रामपंचायत सदस्य अप्पू चिंचणसुरे, तलाठी सूर्यवंशी, व्यापारी प्रमोद वेल्हाळ, जगन जगदाळे, चंद्रशेखर केंगारे, दत्ता अंतरेड्डी, महादेव बिराजदार, कृष्णा कटके, संगमेश्वर कल्याणी व शंकर रुकारे आदी मान्यवर हजर होते.

Post a Comment

0 Comments