Latest News

6/recent/ticker-posts

लातूर येथे राज्यस्तरीय सतत पाच दिवसांचा लिंगायत वधू वर परिचय मेळावा

लातूर येथे राज्यस्तरीय सतत पाच दिवसांचा लिंगायत वधू वर परिचय मेळावा 


लातूर: प.पु.आप्पाजीच्या नावाने व कर्मयोगी कै.शिवदासप्पां बळीरामप्पां पाटील नांवाने, होणाऱ्या राज्यस्तरीय लिंगायत वधू वर परिचय मेळाव्याच्या निमित्त करुन त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे या साठी शिवा लिंगायत युवक संघटना प्रयत्नशील आहे वसुंधरा रत्न राष्ट्र संत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहदपुरकर यांच्या व कै.शिवदासप्पां बळीरामप्पां पाटील यांच्या स्मरणार्थ हे कार्य सुरु करत असून शिवा लिंगायत युवक संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय पाच दिवस चालणाऱ्या लिंगायत वधू वर परिचय मेळावा प्रसंगी, रोज पाच या प्रमाणे विविध क्षेत्रातील पंचेविस "कर्मयोगी लिंगायत रत्न " पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे, या मध्ये, १२/१२/२१ रोजी उद्घाटनप्रसंगी ज्या दिवशी नव वधू वर परिचय मेळावा आहे त्या दिवशी, सर्व प्रथम लिंगायत समाजाची राजधानी असलेल्या लातुर येथील लिंगायत चळवळ व बाणा ज्यांनी आजपर्यंत जपला व पुढील पिढीला यशस्वी पणे सुपुर्द केला,अश्या पाच कर्मयोग्यांचा त्यांच्या कार्याचा गौरव केला जाणार आहे. लिंगायत धर्मातील सत्तर जाती आणि साडेतीनशे उपजाती साठी, राज्यातील दिव्यांग, विधवा, घटस्फोटीत ,परित्यक्ता, विधुर आदी. सदर संघटनेच्या वतीने सोन्याचे मणी मंगळसूत्र,जोडवे, बॅड बाजा,जेवण, सभागृह, जंगम व इतर ही व्यवस्था संघटनेच्या वतीने करण्यात येणार आहे. याकरिता फक्त नोंदणी करायाची आहे फक्त नाममात्र नोंदणी फिस मध्येच लग्न कार्य लावुन द्यायचा निर्णय शिवा लि॑गायत युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दयानंद पाटील व " राज्य स्तरीय " लिंगायत वधू वर परिचय मेळावा चे "अध्यक्ष शंकर अप्पां मोरगे यांनी सोशल मीडिया च्या मार्फत कळविले आहे. अधिक माहिती करिता 9168277000 या भ्रमणध्वनी वरती संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments