Latest News

6/recent/ticker-posts

शिवशंभो प्रतिष्ठान चिचोंडी आयोजित रक्तदान शिबिरात 70 रक्तदात्यांनी केले रक्तदान

शिवशंभो प्रतिष्ठान चिचोंडी आयोजित रक्तदान शिबिरात 70 रक्तदात्यांनी केले रक्तदान


निलंगा
:{ सलिमभाई पठान } तालुक्यातील चीचोंडी या गावी शिवशंभो प्रतिष्ठान यांच्या वतीने "कोरोना सोबत चालू असलेल्या लढाईत आपण ही योगदान द्यायला हवे, "रक्तदान करायलाच हवे" या शीर्षकाखाली महारक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या आयोजित रक्तदान शिबिरात 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदाना मध्ये 11 रक्तदात्यां महिलांचा समावेश होता. गावातील सर्व ग्रामस्थांनी मोलाचे योगदान देऊन महारक्तदान शिबीर पार पाडले. या रक्तदान शिबिराला मोठ्या प्रमाणात तरुण  रक्तदात्यांनी रक्तदान करून मोलाचे सहकार्य केले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिवशंभो प्रतिष्ठान च्या युवकानी सहकार्य केले. संजीवनी ब्लड सेंटर लातूर रक्तपेढी ने या सर्व रक्तदात्यांचे रक्त संकलनाचे काम केले. ब्लड बँकेचे संचालक बालाजी जाधव,जनसंपर्क अधिकारी रोहिणी कातळे, तंत्रज्ञ महादेवी जोगदंड, माधुरी टेकाळे, राणी कावळे, मनीषा विभूते, श्रीदेवी कंबळे, विक्रम चव्हाण, बळीराम गायकवाड या कर्मचारी यांनी रक्त संकलन चे काम पाहिले. शिवशंभु प्रतिष्ठान चे सामाजिक कार्य पाहून गावातील नागरिक नानासाहेब दिगंबर बिरादार यांनी अकरा हजार रुपयाची देणगी दिली. तसेच कै.अनंतराव देशपांडे यांच्या स्मृती स्मृतिप्रीत्यर्थ एकवीसशे रुपये देणगी प्रतिष्ठान ला देण्यात आली.

Post a Comment

0 Comments