अतिवृष्टी व शेतातील नुकसानीमुळे शेतकऱ्याची डोंगरगाव बॅरेज मध्ये उडी घेऊन आत्महत्या
निलंगा:( प्रतिनिधी/रमेश लांबोटे ) अतिवृष्टीने नदी काठावरील ४ एकर शेतीतील सर्वच पिके सडून गेल्याने २ बँकेचे ८ लाख रूपये कर्जाची परफेड कशी करायची, या निराशेपोटी डोंगरगाव बॅरेजमध्ये उडी घेऊन लातुर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डोंगरगाव या गावातील तरूण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डोंगरगाव या गावातील तरूण अल्पभूधारक शेतकरी अजय विक्रम बन (वय- २४) वर्षे या शेतकऱ्याची नदी पाञाच्या काठावर ४ एकर जमीन आहे. मागे झालेल्या अतिवृष्टीने ४ एकरवरील सर्वच खरीप पिके पाण्यात गेल्याने संपूर्णपणे सडली होती. हजारो रूपयाचे बियाणे घालून, पेरणी केली. मात्र, निसर्गाने दगा दिल्याने खरीपाचे हातातोंडाशी आलेले पिके डोळ्यादेखत सडून गेल्याने बँक आॕफ महाराष्ट्र आणि जिल्हा मध्यवर्ती या २ बँकेकडून घेतलेले ८ लाख रूपये कर्ज कसे फेडावे या विवेचनातून सदरीला शेतकऱ्याने हे टोकाचे पाऊल उचले आणि आपले जीवन संपविले आहे. नदीकाठावरील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने नुकसानभरपाई जाहीर केली होती.
0 Comments