Latest News

6/recent/ticker-posts

कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचाऱ्याचा चोरांचा पाठलाग करताना मृत्यू

कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचाऱ्याचा चोरांचा पाठलाग करताना मृत्यू


शेख बी जी 

लातूर: दि. ८ - लातूर शहरातील लक्ष्मी काॅलनी भागात आज(८) पहाटे चोरट्याचा पाठलाग करत असताना एका पोलिस कर्मचार्‍याचा मृत्यू  इन्ना लिल्लाही व इन्ना इलैही रजिऊन पहाटे तीनच्या सुमारास लक्ष्मी काॅॅलनी परिसरात एका घरात चोर आले असता दार तोडल्याचा आवाज ऐकून शेजार्‍यांनी पोलीसांना फोन केला. तात्काळ एल सी बी ची गाडी पोहचली, तीन चोरटे होते ते मागच्या बाजूने पळून जात असताना पोलिसांनी पाठलाग केला. चालक असलेले अहेमद मोहमद खान(५६) हे पाठलाग करताना खाली कोसळले त्याचवेळी त्यांना बहूदा हृदयविकाराचा झटका आला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. तात्काळ त्यांना शासकीय रूग्णालयात पाठविले असता तेथे त्यांना मृत घोषीत केले.वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी घटना स्थळास व रूग्णालयात जाऊन पाहणी केली. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांत  आकस्मिक मृत्यू म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments