ज्येष्ठ पत्रकार संजय जेवरीकर यांच्या लेखणीतून...
राजकीय 'पोस्टमार्टेम' करणाऱ्या डॉक्टर:अर्चनाताई पाटील
आज माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील यांच्या स्नुषा डॉ.अर्चनाताई पाटील यांचा वाढदिवस..
फार दिवसापासूनची एक इच्छा होती डॉक्टर अर्चनाताई शैलेश पाटील याना भेटण्याची..त्यांच्याविषयी खूप ऐकून होतो..एक अभ्यासू डॉक्टर,सजग राजकारणी,थोड्याशा बंडखोर महिला,गांधी घराण्यावर प्रचंड प्रेम असलेल्या,घडणाऱ्या राजकीय घडामोडीवर योग्य भाष्य करणाऱ्या,घरात अनेक वर्षांपासून राजकीय वारसा असूनही अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या न झालेल्या,होणाऱ्या परिणामावर सहज टिपण्णी करणाऱ्या,सामाजिक स्थित्यंतराची जाणीव असलेल्या एका अभ्यासू डॉक्टरची काही दिवसांपूर्वी भेट झाली आणि अनेक गोष्टींची चर्चाही..सुरुवात लोकसभेपासून झाली आणि शेवट आशावादी राजकारणाने..किती किती विषय 20 मिनिटात आम्ही बोलत होतो..जिल्ह्याच्या राजकारणापासून ते देशात घडणाऱ्या घडामोडीपर्यंत..मोदी शहाच्या राजकारणापासून ते राहुल प्रियंकाच्या राजकीय अस्तित्वापर्यंत..मोदींच्या अक्षय कुमारने घेतलेल्या मुलाखतीचा राजकीय अँगल मीही विचारात घेतला नव्हता पण अर्चनाताईने राजेश खन्नाचा जावई म्हणून अक्षयकुमारला भाजपने निवडले असे सांगून तोही राजकीय अँगल सांगून टाकला..मी थोडासा राजकीय लोकांच्या किचन कॅबिनेटवर बोललो आणि राहुलपेक्षा प्रियांकाने सूत्रे हातात घ्यावीत असे म्हणालो तेव्हा अर्चना ताईने अशी किचन कॅबिनेट सगळ्याच पुढाऱ्यांकडे असतात असे सांगून माझी दांडीच उडवली..6 तास मोदींचा रोड शो दाखवणाऱ्या बिकावू मीडियाला त्यांनी चांगलाच शाब्दिक चोप देताना सेकंदाला किती पैसे लागतात असे विचारून माझे मीडिया नॉलेज सुद्धा चेक केले..आजची भेट माझ्यासाठी नवी होती,माझी शैलेश पाटील आणि दिलीप नाकाडे याची जुनी मैत्री होती,आणि ते नाते शिवराज पाटील यांच्या घराचा माझा दुवा होता,याची आठवणही त्यांना करून दिली आणि आम्ही पुन्हा एका धाग्यात बांधले गेलो..का माहीत नाही पण एक वेगळे स्पिरिट मला अर्चनाताई पाटील यांच्या व्यक्तिमत्वात दिसले..खरं तर खूप महत्वाकांक्षा असायला हवी,पण शिवराज पाटील यांच्या शांत राजकारणाचा वारसा त्यांना चालवायचा असेल म्हणून त्याही खूप तोलून मोलून चर्चा करत होत्या..खूप लिहिण्यासारखे आहे मी लिहिनही पण आज मी राजकीय पोस्टमार्टेम करणाऱ्या एका खास डॉक्टरला भेटलो..मी देवघरहून बाहेर पडलो आणि डोक्यात राजकीय गलबतांनी घर करायला सुरुवात केली..शैलेश पाटील खूप शांतपणे अशी परीक्षणे करत असतात आज मी एका वेगळ्या वैचारिक ताकद असलेल्या डॉक्टरला भेटल्याचा आनंद घेऊन घराबाहेर पडलो.. देवघर शांत बसलेले नाही,तिथे राजकीय परिवर्तनाचे वादळ घोंगावत असल्याची काही चिन्हे मला दिसून आली..वेळप्रसंगी त्यावर नक्कीच भाष्य करेन मात्र आजची भेट एका स्पेशल लेडी डॉक्टरची होती हे मात्र खरे..राजकारणाची इतकी मोठी परंपरा असतानाही इतक्या शांतपणे भाष्य करणारी माणसे काँग्रेसमध्ये विरळाच..खरं तर अर्चनाताईंनी हिरीरीने राजकारणात सहभाग घ्यायला हवा,आपली मते मांडायला हवीत.
आज वाढदिवसानिमित्त डॉ.अर्चना ताईंना आभाळभर शुभेच्छा..
बोलते व्हा..
कारण बोलणाऱ्याची मातीही विकते असे म्हणतात..
संजय जेवरीकर{ ज्येष्ठ पत्रकार,सरपंच }
0 Comments