जामा मस्जिद कमिटी निटूर व समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने यास्मिन शेख चा सत्कार
निटुर:( प्रतिनिधी/रमेश लांबोटे ) निलंगा तालुक्यातील निटुर येथील मुस्लिम कुटुंबातील यास्मीन बिलाल शेख या विद्यार्थिनीने वैद्यकीय पूर्व नीट परीक्षेत मध्ये 651 गुण घेऊन घवघवीत यश संपादन केल्याबद्दल त्याचे जामा मस्जिद कमिटी निटूर व समस्त मुस्लिम बांधवा तर्फे आज मस्जिद कमिटीच्या वतीने तिचा व तिचे वडील बिलाल शेख यांचा सत्कार करण्यात आला. यास्मिन शेख यांचे वडील टेलर असून अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये कोविड महामारी सारख्या काळामध्ये अभ्यास करून घवघवीत यश संपादन करून एमबीबीएस ला नंबर लागल्याबद्दल सर्वांनी तिचे कौतुक केले. यावेळी मज्जित कमिटीचे सदर अहेमद मुस्तफा गस्ते, गणीभाई शेख, महेबूब शेख, रसूल सरदार, हशीम माडीवाले, जहांगीर शेख, अलीम गस्ते, निहालपाशा मुल्ला, हैदर मोमिन, इसाकभाई गस्ते, खदिर गस्ते, मिनाज गस्ते, गफार चाऊस, जलील शेख, सह अन्य मुस्लिम बांधवांनी उपस्थित राहून यास्मिन शेखला शुभेच्छा दिल्या.
0 Comments