वरद गुरुकुल विद्या निकेतन करियर अकॅडमी सांगवडे कोल्हापूरला सामाजिक कार्यकर्ते रमेश लांबोटे यांनी दिली भेट
निलंगा:( प्रतिनिधी/इरफान शेख ) निटूर परिसरात आपल्या अनेक सामाजिक कार्यातून ओळख करून देणारे सामाजिक कार्यकर्ते रमेश लांबोटे हे कोल्हापूर जिल्ह्यातील सांगवडे येथील वरद गुरुकुल विद्या निकेतन व लक्षवेध करियर अकॅडमी यांना भेट दिली सांगली सातारा या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर या संस्थेने प्राणीमात्रांवर दया दाखवत शंभर जनावरांना दोन महिने चारापाणी केले व तसेच तेथील ग्रामस्थांना दोन वेळचे भोजन स्वखर्चाने दोन महिने दिवस पुरवले त्यांच्या या सामाजिक समाजकार्याबद्दल आज सामाजिक कार्यकर्ते रमेश लांबोटे यांनी भेट देऊन संस्थापक सी एस पाटील यांचा सत्कार केला यावेळी मुख्याध्यापक एस एस बरगले मॅडम. उपमुख्याध्यापिका कुंभार मॅडम, सौ.एस सी पाटील मॅडम, ये डी नवले, एच एस शिरसागर मॅडम, एम ए कुंभोंजे, राम पूजारी सह निलंगा तालुक्यातील अरविंद गूंजिटे, धनराज घोडके, करीबसवेश्वर पाटील कोराळीकर हे उपस्थित होते. उपस्थितांनी या संस्थेच्या शिक्षकांचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले.
0 Comments