ईश्वर-अल्लाह यांच्या आशीर्वादानेच लातूरची सेवा करण्याची संधी- पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे
लातूर:(विशेष प्रतिनिधी/शेख इरफान ) रक्तदान हे खुप महत्वाचे दान आहे,ज्यामुळे एखाद्याचा जीव वाचवण्याचा आनंद रक्तदान करून होतो तो आनंद जगात कोणताच आनंद नाही, लातुरची जनता सुद्न्य आहे, अल्लाह आणि ईश्वराच्या आशीर्वादानेच मला लातुरकरांची सेवा करण्याची संधि मिळाली आहे, महामणवाच्या जयंत्या या अशाच प्रकार झाले पाहिजेत असे प्रतिपादन लातूर जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी शहीद टीपू सुलतान यांच्या जयंती निमित्त व्यक्त केले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मकबूल भोयरेकर होते. विशेष अतिथि म्हणून नांदेडचे तंजीम ए इंसाफ छे विभागीय अध्यक्ष मोहम्मद बशीर होते तर प्रमुख अतिथि म्हणुन संघटनेचे अध्यक्ष मोहसिन खान, हामिद खान, आर झेड हाशमी, गौस शेख, मन्सूर अली होते, गंजगोलाई या भगत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला,कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी जिलाध्यक्ष शादुल शेख, फिरोज शेख, जब्बार बागवान, हाफिज शेख, मोहम्मद अली बाबा, सत्तर शेख, वसीम पठान, सईद रियाज यांनी परिश्रम घेतले.
0 Comments