निलंगा तालुक्यातील चिचोंडी गावात शेतकरी मार्गदर्शन मेळावा
शिरोळ:( प्रतिनिधी/सलीमभाई पठाण ) निलंगा तालुक्यातील चिचोंडी या गावी रमाकांत देशपांडे उत्कृष्ट ऊस उत्पादक शेतकरी यांनी त्यांच्या फार्महाऊसवर शेतकरी मेळावा आयोजित केला होता. शेतकरी मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी सुरेश कबाडे ऊस भूषण शेतीनिष्ठ संचालक गन्ना मास्टर ॲग्रो इंडस्ट्रीज पश्चिम महाराष्ट्र व प्रसाद पवार प्रगतशील ऊस उत्पादक शेतकरी संचालक गन्ना मास्टर ऍग्रो इंडस्ट्रीज हे उपस्थित होते. उसाची शेती करत असताना आधुनिक पद्धतीने ऊस लागवड कशी करावी, उसाचे संगोपन कसे करावे व उसावर फवारणीसाठी लागणारे औषधे व खते याबद्दल सविस्तर अशी मार्गदर्शन सुरेश कबाडे यांनी केले. तर शेतीमध्ये मशागतीची कामे तसेच पाचट कुजण्याची काम, ऊस सरीतील अंतर याबद्दल प्रसाद पवार यांनी माहिती दिली. देवणी तालुक्यातील शेतीनिष्ठ ऊसभूषण शेतकरी विनोद मोमेले गुरधाळ यांनी स्वतःच्या शेतीमध्ये त्यांनी गन्ना मास्टर या टीम सोबत राहून त्यांची उत्पादने वापरून प्रति एकरी 100 टन उसाचे उत्पादन घेतल्या चा अनुभव व्यक्त केला. यावेळी परिसरातील शंभर ते दीडशे ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन रमाकांत देशपांडे चिचोंडी यांनी त्यांचे शेतातील फार्महाऊस वर केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार महावीर काकडे यांनी केले तसेच उपस्थित शेतकऱ्यांचे आभार शेतकरी सुंदर राठोडे यांनी मानले.तसेच उपस्थित सर्व शेतकऱ्यांनी मिळालेल्या मोलाच्या मार्गदर्शनाबद्दल व शेतकरी मेळावा आयोजन या कार्यक्रमाबद्दल रमाकांत देशपांडे, सुरेश काबडे, प्रसाद पवार, विनोद मोमले यांचे सुयूंक्त सत्कार करून अभिनंदन केले.
0 Comments