जेष्ठ समाजसेवक एन.आर.स्वामी यांचं निधन
निलंगा: येथील जेष्ठ समाजसेवक, सेवानिवृत्त नायब तहसीलदार तथा माहिती अधिकार कार्यकर्ते एन.आर. स्वामी यांचं दि. २१ नोव्हेंबर २०२१रोजी रविवारी पहाटे ०३:०० वाजेच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले मृत्यूसमयी ते ८२ वर्षाचे होते. ते माहिती अधिकार कार्यकर्ते होते. हजारो अर्ज करून माहिती अधिकारात माहिती मिळवून त्यांनी जनतेला न्याय दिला. सत्ताधारी लोकांच्या व अधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणा विरोधात लढा देऊन हजारो सार्वसामान्य लोकांना त्यांनी न्याय मिळवून देण्याचे कार्य केले. त्यांच्या पार्थिव देहावर आज दि.२१ रोजी दुपारी १:०० वाजता निलंगा येथील लांबोटकर पेट्रोल पंपाच्या पाठीमागील त्यांच्या शेतात अंतीमसंस्कार करण्यात येणार आहेत.
0 Comments