Latest News

6/recent/ticker-posts

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबास केली आर्थिक मदत

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबास केली आर्थिक मदत


बी डी उबाळे

औसा: दि. 4 - नागरसोगा ता औसा येथील लालगिर गिरी या तरुण शेतकऱ्याने कर्जाला कंठाळून आत्महत्या केली होती. त्याच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी एक मुलगा असा परिवार असून ही दिवाळी त्यां आत्महत्या ग्रस्त कुटुंबासाठी किती वेदनादायक असेल याची कल्पना न केलेली बरी! या कुटुंबाला त्यांच्या घरी प्रत्यक्षात जाऊन गुरुवार दि 4 ऑक्टोबर 2021 रोजी ऐन दिवाळीमध्ये घरी जाऊन राजेंद्र मोरे आणि राजीव कसबे यांनी करुणामय मानवतेच्या दृष्टीने सांत्वन पर भेट देऊन आवश्यक त्या गरजेपुर्ती आर्थिक मदत केली. शेतकरी उपेक्षितांची चळवळ करताना सामाजिक बांधिलकीचा वसा आम्ही सोडणार नसून या अत्यंत वाईट प्रसंगात आम्ही या कुटुंबासोबत आहोत याची प्रचिती यातून दिसून येते. या भागातील कारखानदार दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले. सरकारच्या योजनेसह समाजातील संवेदनशील असलेल्या दानशूर व्यक्तींकडे मदत करण्यासाठी पाठपुरावा करू अशी भेटीनंतर घेतली असल्याचे समजतें.

Post a Comment

0 Comments