Latest News

6/recent/ticker-posts

निटुर ग्रामसेवकाच्या विरोधात जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गटविकास अधिकारी, निलंगा यांच्याकडे तक्रार.

निटुर ग्रामसेवकाच्या विरोधात जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गटविकास अधिकारी, निलंगा यांच्याकडे तक्रार.


निटूर: निलंगा तालूक्यातील मोठ्या ग्रा.पं.पैकी एक निटूर ग्रामपंचायत होय याच ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी गुरूवारी चक्क सदस्यालाच जातिवाचक शिवीगाळ केल्याचे समोर येत आहे. निटूर मधील प्रभाग चार मधून अनूसुचित वर्गातून ग्रा. पं.सदस्य म्हणून बळीराम मदाळे हे मोठ्या फरकाने निवडून आले आहेत अत्यंत संयमी व शांत कार्यकर्ता म्हणून निटूरमध्ये त्यांची ओळख आहे माञ प्रभागातल्या समस्ये संदर्भात ते ग्रा.पं.मध्ये गेले असता त्यांना जातिवाचक शिवीगाळ करून ग्रामसेवकानी ग्रामपंचायत सदस्यालाच चक्क जातीवाचक शिवीगाळ करून कार्यालयाच्या बाहेर हाकलून दिल्याची घटना घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत असून संबधित मुजोर ग्रामसेवकावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी ग्रा. पं.सदस्य बळीराम मदाळे यांनी गटविकास अधिकारी,निलंगा यांच्याकडे केल्याने खळबळ उडाली आहे. आता प्रशासन ग्रामसेवकावर काय कारवाई करणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments