Latest News

6/recent/ticker-posts

औसेकरांची पाण्यासाठी भटकंती सुरू,प्रशासकाच्या नियोजनशून्य कारभारामुळे वैतागले औसेकर

औसेकरांची पाण्यासाठी भटकंती सुरू,प्रशासकाच्या नियोजनशून्य कारभारामुळे वैतागले औसेकर


शेख बी जी.

औसा: दि.9 नगर पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता संपुष्टात आल्यानंतर मागील चार ते पाच महिन्यांपासून औसेकरांसाठी त्रासदायक ठरले आहेत. येथील नागरिकांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या समस्ये मध्ये उन्हाळ्यात पाण्याचा मुबलक पुरवठा असतानाही नियोजन शून्य कामामुळे औसेकरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. 20-20 दिवस नळाला पाणी येत नाही. महिला व बालक पाण्यासाठी भटकंती करत असतानाचे चित्र शहरात दिसून येते. यासंबंधी राष्ट्रवादी नेत्यांशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी सांगितले की पालक मंत्री यांनी नियुक्त केलेला प्रशासक हा योग्य कामे करत नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. येथील जनतेला पैसे मोजून टँकरद्वारे खरेदी पाणी घेण्याची वेळ आली आहे. तावरजा व माकणी येथून मुबलक पाणी असूनही जनतेला पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. तत्कालीन राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारपूस करून पाहण्याची सोय करता येत होती. मात्र यापुढे कोणाला विचारावे? कोण पाणी देणार ? असा प्रश्न जनतेसमोर उभा आहे. पाण्याच्या प्रश्‍नाकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे व ही समस्या ताबडतोब सोडावी अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.

Post a Comment

0 Comments