Latest News

6/recent/ticker-posts

छत्रपती शाहु ज्युनियर काँलेजची निकालाची परंपरा कायम

छत्रपती शाहु ज्युनियर काँलेजची निकालाची परंपरा कायम

 


                 

निटुर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी दुपारी 1:00 वा जाहीर करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी छत्रपती शाहू ज्युनियर काँलेजने उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखत कनिष्ठ महाविद्यालयाचा एकूण निकाल  99.12% लागला आहे. यात विज्ञान शाखेचा 100%, कला शाखा 97% व वाणिज्य शाखेचा 100%निकाल लागला आहे. या महाविद्यालयातुन उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षेत 115 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते त्या पैकी 39 विद्यार्थी विशेष प्राविण्यात, 68 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 6 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत असे 113 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  महाविद्यालयातुन  व विज्ञान शाखेत जाधव अनिकेत दत्ताराव (85.83%)प्रथम, कु.निटुरे कल्लेश्वरी राजेंद्र (82.17%)द्वितीय तर कु. शेख नजमा गौस(81.50%) व कु चव्हाण स्नेहा बाळु(81.50%)  तृतीय, माळी अभिजीत दिगंबर(81.17%) गुण मिळवले, वाणिज्य शाखेतुन प्रथम कु. सागर वैष्णवी बालाजी (82%),द्वितीय कु. पवार प्रिती दिगांबर (81%), तृतीय कु. मुगळे निकिता नामदेव (79.67%) व कवडे पंकज नागनाथ(79%) गुण घेवुन उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेत प्रथम सोमवंशी ऋषीकेश (76.50%), द्वितीय शिंदे श्रीराम रावळाजी (73%), तृतीय गजभरे काशिनाथ मल्लिकार्जुन(72.50%), आणि गस्ते खाजा ईसाक (71.83%) गुण घेवुन उत्तीर्ण झालेले आहेत. 

महाविद्यालयातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन माजी मंत्री बाळासाहेब जाधव, सचिव आ. बाबासाहेब पाटील, प्राचार्य अनिल पाटील, प्रा. संतोष सोमवंशी, सौ.भाग्यश्री सोमवंशी, प्रा. जीतेंद्र जाधव, प्रा. शरद कांबळे, प्रा. सतिश जाधव, प्रा. सतिश वाघमारे, प्रा. विष्णुदास इंगलवाड, प्रा. अश्विनी भारती, प्रा. महेश निटुरे, प्रा. अमोल सोमवंशी प्रा. सचिन भोजने प्रा. दत्ताराव जाधव, मनोज जाधव, सूर्यकांत बाचिफळे, शिवाजी सुर्यवंशी, जाधव ताई, बी. सी. गिरी आदि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व निटुर पंचक्रोशीतील नागरिकांनी कौतुक व अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments