ग्रामरोजगारसेवक संघटनेच्यावतीने गट विकास अधिकारी भालके यांचे स्वागतपर सत्कार
लातूर: पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी पद्दोनती ने नियुक्ती झालेले तुकाराम भालके साहेब यांनी पदभार स्वीकारला त्यावेळी आम्ही महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या वतीने भेट घेऊन त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच तालुक्यातील रोजगार हमी व विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी गट विकास अधिकारी यांनीही त्यातील रोजगार सेवकांना सखोल अशी मार्गदर्शन केले. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघटनेचे जिल्हा सचिव अमोल घायाळ, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख विठ्ठल पांचाळ, जिल्हा उपाध्यक्ष बालाजी उबाळे, सुलिंदर सरवदे, धनराज कतलाकुटे, गणेश अर्जूने, अरुण सुरवसे, पत्रकार मारुती काळे यांच्या सह लातूर तालक्यातील अनेक रोजगार सेवक उपस्थित होते.

0 Comments