Latest News

6/recent/ticker-posts

आबासाहेब इंग्लिश स्कूल मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

आबासाहेब इंग्लिश स्कूल मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार


देवणी:(प्रतिनिधी/विक्रम गायकवाड) शालांत प्रमाणपत्र परीक्षा 2022 चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. आबासाहेब इंग्लिश स्कूलचा 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल 100% लागला असुन या परीक्षेमध्ये शाळा व तालुक्यातुन प्रथम येण्याचा मान टोनकाकाटे अंबादास बाबूराव या विद्यार्थ्याने 95.20% गुण घेवून मिळवला आहे. तसेच शुभम लांडगे याने 94.80% गुण घेवुन शाळा व तालुक्यातून द्वितीय येण्याचा मान मिळवला. तर रोहन दारनुळे याने 91.60% गुण घेऊन शाळेतून व तालुक्यातुन तृतीय आला आहे. हरी माने याने 90.60% तर मनोज बलटे याने 88.80% गुण घेवुन घवघवीत यश संपादन केले आहे. त्यामुळे शाळेच्या वतीने इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षेत चांगले गुण घेवुन यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार सोहळा  आबासाहेब इंग्लीश स्कूल मध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोविंदराव भोपनिकर उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्था सचिव गजानन भोपनिकर उपस्थित होते. यावेळी मंचावर प्रा.डॉ.अनिल इंगोले, विजयनगरचे उपसरपंच बोरोळे, वार्ताहर बालाजी टाळीकोटे, विक्रम गायकवाड, प्रा.रेवण मळभागे, लक्ष्मण रणदिवे, निलेश लांडगे तसेच कै.रसिका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंद्रकांत जावळे, उपप्राचार्य डॉ.शिवाजी सोनटक्के व आबासाहेब इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका सुप्रिया कांबळे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संखेने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments