अखिल अहमद देशमुख यांची सेवानिवृत्ती
नळेगाव: चाकूर तालुक्यातील नळेगाव येथील अल फारुख उर्दू प्राथमिक शाळेचे जेष्ठ शिक्षक अखिल अहमद देशमुख दीर्घ सेवेनंतर ३० जुन २०२२ रोजी सेवानिवृत झाले. त्या निमित्त शाळेच्या वतीने ३० जुन २०२२ रोजी सत्कार करून निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाचे अध्यक्ष नजीब जागीरदार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून खुदबोद्दीन घोरवाडे, शमीम कोतवाल, दाउद बागवान, बाबर घोरवाडे, अतिक बागवान, मौलाना कलीम सॊदागर, तय्यब कारवाडे, मुखीम देशमुख, मोहम्मद बकऱ्यावाले, डॉ.मसुद देशमुख, शकील जागीरदार, मुद्दासिर सॊदागर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इर्शाद पिरजादे यांनी केले आणि आभार मुख्याधपाक वहाब जागीरदार यांनी मानले. यावेळी मुख्याध्यापक कादिर जागीरदार यांनी प्रास्ताविक केले. मुजीब शेख, समद शेख, इस्माईल सय्यद, युनूस शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सत्कारला उत्तर देताना अखिल अहेमद देशमुख यांनी आपली २८ वर्षाचे सेवेतील अनुभव सांगितले तसेच संस्थाचे शाळेचे आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले. देशमुख यांच्या भावी आयुष्यासाठी संस्थेचे अध्यक्ष नजीब जागीरदार यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी हाश्मी मोईनोद्दीन,लायक सोदागर,कासीम शेख, इल्यास शेख, मुंजेवार बाबू , हुसेन घोरवाडे, खुरेशी साहेबलाल, उस्मान इनामदार, जमील पटेल, महेबूब शेख, रफीख मणियार आदीनी परिश्रम घेतले.


0 Comments