मराठा सेवा संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
निलंगा:(विशेष प्रतिनिधी/इरफान शेख) येथील मराठा सेवा संघाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे तालुक्यातील दहावी व बारावी बोर्ड परीक्षेतील प्रथम आलेल्या 80 गुणवंत विधार्थ्यांसह सामाजिक , शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पाच जणांना विशेष सत्कार मूर्ती असे एकूण 85 सत्कारमूर्तीचा मान्यवरांच्या हस्ते जिजाऊ शृष्टी निलंगा येथे सत्कार करून गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष गटविकास अधिकारी अमोल ताकभाते हे उपस्थित होते . तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी सुरेश गायकवाड , डॉ धनंजय गायकवाड , राज्य उपाध्यक्ष लिंबराज सूर्यवंशी , शिक्षण विस्तार अधिकारी संतोष स्वामी , उधोजक विभागीय अध्यक्ष आनंद गायकवाड , जगद्गुरूं तुकोबारायचे महासचिव बालाजी जाधव , तालुका अध्यक्ष डॉ एस एस शिंदे , जिल्हा सचिव एम एम जाधव आदी उपस्थित होते. निलंगा मराठा सेवा संघाच्या वतीने तालुक्यातील दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत विधालयातुन व तालुका स्तरावर प्रथम आलेल्या 80 गुणवंत विध्यार्थ्यांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पाच जणांना विशेष सत्कारांनी असे एकूण 85 सत्कारमूर्तींना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी , प्रमाणपत्र पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले . यात विशेष सत्कार मूर्ती म्हणून डॉ मयुरी मारुतीराव जाधव , उत्कृष्ट शाळा म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भूतमुगळी , योगेश अभंग माने , शशांक सचीन बसुदे निलंगा हेल्थ अँड स्पोर्टस फाउंडेशन यांना सन्मानित करण्यात आले .
कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ उद्धव जाधव , आर के नेलवाडे , इंजि मोहन घोरपडे , डी एन बरमदे , उत्तम शेळके , डी बी बरमदे , डी बी गुंडुरे , अजय मोरे , आनंद जाधव , अंबादास जाधव , ऍड तिरुपती शिंदे , कुमोद लोभे , विनोद सोनवणे , आतुल देशमुख , ज्ञानेश्वर जाधव , बालाजी बरमदे , दत्तात्रय बाबळसुरे , किरण धुमाळ , बंटी देशमुख , पी एस सगरे , प्रमोद कदम , सुबोध गाडीवान आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष डॉ एस एस शिंदे यांनी केले . तर सूत्रसंचलन सतीश हानेगावे व आभार डी बी बरमदे यांनी मानले.


0 Comments