गोविंदरावजी भोपणीकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा; 27 रक्तदात्याने केले रक्तदान
देवणी:(प्रतीनीधी/विक्रम गायकवाड) रसिका महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष गोविंदराव भोपणीकर यांचा 63 वा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. रक्तदान शिबिराचे व वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. रक्तदान शिबिराचे उद्घाटन रामराव बिरादार भोपणीकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
यावेळी संस्था सचिव गजानन भोपणीकर, प्राचार्य डॉ. चंद्रकांत जावळे, उपप्राचार्य डॉ. शिवाजी सोनटक्के, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. गोपाल सोमाणी यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी गोविंदराव भोपणीकर यांच्या शुभ हस्ते महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यानंतर वाढदिवसानिमित्त गोविंदराव भोपणीकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी रेणुका पतंगे यांनी स्वागत गीत सादर केले.
यावेळी संस्था सचिव गजानन भोपणीकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत जावळे उपप्राचार्य डॉ. शिवाजी सोनटक्के, आबासाहेब इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या सुप्रिया कांबळे, तालुका कृषी अधिकारी एस. आर. पाटील, सहायक कृषी अधिक्षक डी. जे. मोरे, कृषी सहाय्यक एस. व्ही. धनेगावे, बी. एन. अंकुलवार, परभणी येथील बी. रघुनाथ महाविद्यालयाचे संस्थाचालक ओमप्रकाश दागा, डॉ. नागोराव पाडोदे, लासोना येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन सुभाष माने, माजी चेअरमन मुरहारी माने, बालाजी माने, सोपान हुलसुरे, सरपंच धनराज मठपती, उपसरपंच अंकुश माने, रोहित माने, देवणी खुर्द येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन रतनराव गरड, व्हाइस चेअरमन माधव पाटे, सचिव मुरहरी शिवणखेडे, दत्ता पाटील, गणेश फावडे, रामराव बिरादार, मालबा घोणसे, पत्रकार विक्रम गायकवाड, बालाजी टाळीकोटे, गिरीधर गायकवाड, मधुकरराव लांडगे, गजानन लांडगे आदीने गोविंदरावजी भोपणीकर यांचा सत्कार करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कु. आरोही भोपणीकर, कु. आणवी भोपणीकर यांच्यासह आबासाहेब इंग्लिश स्कूल व कै.रसिका महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व देवणी व परिसरातील काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून गोविंदराव भोपणीकर यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ. शिवाजी सोनटक्के यांनी केले आभार मंटोळे प्रियंका यांनी व्यक्त केले.




0 Comments