Latest News

6/recent/ticker-posts

माझं लातूर परिवाराचे सामाजिक उपक्रम प्रशंसनीय- अभिजित बांगर

माझं लातूर परिवाराचे सामाजिक उपक्रम प्रशंसनीय- अभिजित बांगर

नवी मुंबई महानगरपालिकेत माझं लातूर परिवाराची "संविधान उद्देशिका"

नवी मुंबई: माझं लातूर परिवाराने हाती घेतलेल्या दिशादर्शक संविधान उद्देशिका वितरण उपक्रमांतर्गत आज नवी मुंबई महानगरपालिका कार्यालयात आयुक्त अभिजीत बांगर यांना "संविधान उद्देशिका" सन्मानपूर्वक भेट देऊन राबविण्यात आला. आयुक्त बांगर यांना परिवाराच्या सामाजिक उपक्रमांची माहिती पत्रकार तथा परिवाराचे क्रियाशील सदस्य के वाय पटवेकर यांनी दिली. या सर्व उपक्रमांची आयुक्त यांनी प्रशंसा करीत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी माझं लातूर परिवाराचे सदस्य "मराठी अस्मितेचा इशारा" या वृत्तपत्राचे संपादक के.वाय.पटवेकर, विधीतज्ञ सौ.पल्लवी राजपक्षे, मनोज राजपक्षे, डॉ. जयाजी नाथ(नगरसेवक), पीपल्स एज्युकेशन इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक भास्कर पवार, अशोक गुरखे (नगरसेवक), देवानंद रंगारी, माजी सैनिक अजित न्यायनिर्गुणे आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments