Latest News

6/recent/ticker-posts

भादा येथील मुख्य रस्त्याने घेतला मोकळा श्वा

भादा येथील मुख्य रस्त्याने घेतला मोकळा श्वास


बी.डी.उबाळे

औसा: औसा तालुक्यातील भादा येथील मुख्य रस्त्यांच्या बाजूने मोठ्या प्रमाणात घाण साठलेली आणि अतिक्रमणित काही भाग टाकाऊ आणि कचरा असल्याने रस्त्यावरून प्रवास करणे मोठे कठीण जात होते. याची दखल घेत ग्रामपंचायत कडून गेल्या दोन दिवसांमध्ये हा मुख्य रस्ता भादा - मुरुड पूर्णपणे, मजूर आणि जेसीबी मशीनद्वारे साफसफाई करण्यात आली आहे.


स्वच्छतेमुळे संक्रमित रोगराई ही होणार नाही मानवी जीवनासाठी फायद्याचे ठरेल. तर हे रस्त्यालगतची साफसफाई केल्याने रस्ताही रुंदीकरण करण्यात आल्यासारखा दिसत असून वाहनांची क्रॉसिंग होण्यासाठी हा सुलभतेचा रस्ता दिसत आहे. ज्यामुळे अतिक्रमणित जागा ही टाकाऊ आणि उपद्रवी वस्तू पासून प्रवास करणाऱ्या प्रवासी नागरिकांना आणि वाहनांना-समोरासमोरून एकमेकांना बाजू देताना मोठा अडथळा निर्माण होत होता याची दखल घेत ग्रामपंचायतने हा मुख्य रस्ता पूर्णपणे साफ केला आहे.

 यामुळे या रस्त्याने मोकळा श्वास घेतला आणि त्या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालक आणि प्रवासी नागरिकांना सुरक्षित असा प्रवास करण्याची संधी भादा ग्रामपंचायत ने निर्माण करून दिली असल्याची चर्चा असून यामुळे हा मुख्य रस्ता यावर दिवसासाठी हजारो वाहनांची रेलचेल सुरू असते ही रेलचेल व्यवस्थितरित्या होण्यासाठी या साफसफाई केल्याचा मोठा फायदा होणार आहे. यामुळे भादा ग्रामपंचायत आणि संबंधित काम करणाऱ्या उपसरपंच बालाजी शिंदे यांचे आणि ग्रामपंचायत सदस्य सह ग्रामविकास अधिकारी यांच्या निर्णयाचे स्वागत वाहनधारकासह सामान्य नागरिकांतून होत आहे.

Post a Comment

0 Comments